अर्धवट सोडलेले लेख...
एखादी जूनी कविता....
एखादी चुकलेली आकडेमोड...
एखादं न सुटलेलं कोडं..
कधी संदर्भासाठी आठवण म्हणून....
कधी नको असलेली अडगळ म्हणून...
कधी मागचं सारं सोडून नव्याने केलेली सुरुवात म्हणून...
वहीत दुमडून ठेवलं असतं ते पान..
-विनायक कांबळे