Sunday, April 13, 2025

Between Logic and Legacy: Scientists and Superstitions


We often imagine scientists as champions of logic—people who test hypotheses, analyze data, and debunk myths. But peel back the layers, and you might find something surprising: even those deeply immersed in science are not immune to the pull of superstition.

Across societies, superstitions, customs, and traditional beliefs persist, quietly passed down from generation to generation. They’re stitched into the fabric of our lives—often followed unconsciously, with no one stopping to ask why. Before we can even begin to think scientifically about these practices, we need to first notice them. And that awareness usually comes not from textbooks, but from experience—a passing comment, an odd ritual, or a moment that challenges our assumptions.

For many, formal education might seem like the natural antidote to blind belief. But the truth is more complicated. Despite years of schooling, even the most scientifically educated individuals can struggle to apply their rationality beyond the confines of their discipline. It’s not uncommon to find scientists who conduct cutting-edge research by day and still follow age-old customs at home— fasting on certain auspicious day, checking horoscopes, or avoiding meat on specific days.

This contradiction often begins early. As children, we absorb the customs around us—like not stepping out during an eclipse, avoiding certain activities during menstruation, or interpreting the fall of a lizard on us as a bad sign. These practices vary based on region, religion, caste, socioeconomic status, and family background, but they are near-universal in presence. Rarely are they questioned.

When we start learning science in school, we’re introduced to a new way of thinking—one that demands evidence, encourages skepticism, and values logic. Slowly, we begin to notice the inconsistencies. We start to ask, “Why do we do this?” But too often, those questions are dismissed. “You won’t understand,” adults say. Or worse, “Don’t question tradition.” Eventually, we stop asking. We comply—not out of belief, but out of habit. The practices remain, unquestioned, and we move on.

Later, science becomes an academic pursuit. We excel in exams, earn degrees, and specialize in fields like engineering, medicine, or pure sciences. Some of us go on to research, working in prestigious institutions, designing experiments, and contributing to the global body of knowledge. Within the four walls of the laboratory, we apply the principles of science with rigor. But once we step outside, that mindset just fades.

Even within scientific spaces, subtle forms of irrationality still linger. It’s not uncommon to find researchers timing the start of an experiment with an “auspicious day,” or submitting a paper for publication only during a “favorable hour.” Some hesitate to leave experiments unattended—not due to technical concerns, but because it feels unlucky. Others invoke religious faith to drive research, interpreting success or failure as divine will rather than the result of design or error.

This blending of personal belief with professional inquiry may seem harmless—but it sends a problematic message to the public.

In society, scientists are often seen as role models—symbols of truth-seeking and rationality. When individuals in such respected positions openly follow practices disconnected from evidence-based science, it creates confusion. It sets a precedent that such duality is not only acceptable, but ideal. Worse, young students and aspiring scientists may be discouraged from thinking critically when they’re told, “Even that famous scientist believes in it—why don’t you?” This undermines the very spirit of scientific inquiry.

In such moments, genuine practitioners of rational, evidence-based science are sidelined. Their insistence on questioning norms is brushed aside in favor of the “successful” scientist who still adheres to superstitions. This, over time, dilutes the scientific ethos and gives rise to the misleading idea that science and irrational belief can comfortably coexist.

We must actively educate the public that scientists are not a monolithic group. They are, first and foremost, human beings—shaped by their upbringing, environment, and personal beliefs. Science doesn’t automatically erase inherited traditions or emotional attachments. But the key distinction lies in awareness. Not every scientist represents the spirit of science, and not every belief deserves equal weight in scientific discourse.

Society needs to understand that belief and knowledge are not the same. Evidence-based science demands rigor, repeatability, and reason. And while people may carry their private beliefs, those in scientific roles must be especially mindful of the example they set—because the impact of their actions extends beyond the lab and into the collective understanding of what science truly means.

And finally, we must remember: after all, scientists are also like other people. They belong to the same society as everyone else. They grow up with the same stories, customs, and rituals. They too have diverse beliefs, ideologies, and emotional attachments. But that’s where the journey toward true scientific thinking begins—not by pretending to be immune to bias, but by acknowledging it.

As individuals, we each carry our own bundle of beliefs.

I, too, may hold certain superstitions or irrational habits. But the responsibility lies with me—to reflect on them, to question them, and to correct them. That is the path to a more scientific mindset—not just in theory, but in practice. In our lives, in our work, and in our vision for humanity.

Because science, at its heart, is not just about discovering new truths. It’s also about unlearning old assumptions—and having the courage to grow beyond them.

-Dr. Vinayak Kamble

शास्त्रज्ञ, अंधश्रद्धा आणि तर्क


आपण अनेकदा शास्त्रज्ञांची कल्पना अतिशय बुद्धिमान आणि "कायम तर्कसंगत" म्हणून करतो — असे लोक जे प्रयोग करतात, निरीक्षण करतात, आणि चुकीच्या गोष्टींचा पर्दाफाश करतात. पण जर आपण त्यांच्या जीवनाचा थोडा खोलवर विचार केला, तर काही आश्चर्यजनक गोष्टी लक्षात येतील — अगदी विज्ञानात गुंतलेले लोकही अंधश्रद्धेपासून पूर्णपणे मोकळे नसतात.

जगात अनेक समाजांमध्ये अंधश्रद्धा, पारंपरिक चालीरीती आणि विश्वास अजूनही टिकून आहेत.  या सगळ्या गोष्टी ठिकाण, जात-धर्म, घरातली एकूणच शैक्षणिक स्थिती, आर्थिक स्थिती, आजूबाजूचा समाज या सगळ्या गोष्टींमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा समज-गैरसमजांना पाळले ​जातात आणि त्यानुसार त्या बदलतात; पण तरी​ही, कोणत्या ना कोणत्या प्रकारचे असे समज​-गैरसमज जवळपास सगळ्याच घरांमध्ये असतात. हे सरळपणे पिढ्यानपिढ्या चालत आले आहेत. 

कुठली नेमकी श्रद्धा आणि कुठली अंधश्रद्धा​- आणि कुठला वैज्ञानिक दृष्टिकोन याचा विचार करण्याआधी ह्या गोष्टीची जाणीव व्हावी लागते. हा विचार मनात यायला तशा गोष्टी घडाव्या लागतात​. काहीतरी वाचनात येतं​, कुणाशी तरी त्याबद्दल बोलणं होतं​, कुणाचं काहीतरी बोलणं ऐकलं जातं​, पाहिलं जातं​, त्यावरून आपल्याला आपल्या श्रद्धा​-अंधश्रद्धांचा विचार करण्याची संधी मिळते​. एरव्ही आपल्या दैनंदिन जीवनात ते इतके मिसळून गेले आहेत की आपण त्यांना नकळत पाळतो — कोणीही “हे का?” विचारत नाही. विज्ञानाच्या दृष्टीने विचार करण्याआधी, हे सगळं आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आणि ही जाणीव आपल्याला बहुतेक वेळा पुस्तकांतून नव्हे, तर अनुभवातून मिळते — एखादं वाक्य, एखादी विचित्र परंपरा, किंवा आपली विचारसरणी बदलवणारा एखादा प्रसंग.

बर्‍याच लोकांना वाटतं की शिक्षण मिळालं की अंधश्रद्धा आपोआप निघून जाईल. पण हे इतकं सोपं नसतं. कित्येक वर्षे अभ्यास केल्यानंतरसुद्धा काही शास्त्रज्ञ आपल्या क्षेत्रात तर तर्कशुद्ध राहतात, पण इतर वेळेस जुन्या चालीरीतींना पाळतात — विशिष्ट वेळी प्रयोग सुरु करणे, राशी पाहणे, किंवा आठवड्याचे काही विशिष्ट दिवस मांसाहार टाळणे.

ही विसंगती लहानपणापासूनच सुरू होते. लहानपणी आपण आजूबाजूचे नियम आपोआप शिकतो — ग्रहणाच्या वेळी बाहेर न जाणे, मासिक पाळीत काही गोष्टी टाळणे, किंवा पाल पडल्यास अपशकुन मानणे. या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या भागांनुसार, धर्मानुसार, जातीनुसार, आर्थिक स्थितीनुसार किंवा घरातील वातावरणानुसार वेगळ्या असू शकतात — वेगवेगळ्या का असेना पण त्या सगळीकडे दिसतात. फार थोड्याच वेळा त्यांचं कारण विचारलं जातं.

शाळेत विज्ञान शिकायला लागल्यावर आपल्याला विचार करण्याची नवीन पद्धत शिकवली जाते — प्रयोग सिद्ध करून पुरावा मागितला जातो, शंका घेणे प्रोत्साहित केले जाते, आणि तर्कशक्तीला महत्त्व दिले जाते. हळूहळू आपल्याला काही गोष्टी विसंगत वाटायला लागतात. आपण विचारू लागतो, “आपण असं का करतो?” पण बऱ्याच वेळा मोठ्यांकडून हे प्रश्न टाळले जातात. मोठे लोक म्हणतात, “तुला नाही कळणार.” किंवा “परंपरेवर प्रश्न विचारायचे नसतात.” आणि मग आपण विचारणं बंद करतो. सवयीने आपण त्या गोष्टी करत राहतो — श्रद्धेमुळे नव्हे, तर सवयीमुळे.

नंतर, विज्ञान हे आपलं अभ्यासाचं क्षेत्र बनतं. आपण परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतो, पदव्या घेतो, आणि इंजिनीअरिंग, वैद्यकीय, किंवा मूलभूत विज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जातो. काहीजण संशोधन करतात, मोठ्या संस्थांमध्ये काम करतात, आणि जगभरात ज्ञानात भर घालतात. प्रयोगशाळेत आपण विज्ञानाचे नियम काटेकोरपणे पाळतो. पण एकदा प्रयोगशाळेच्या चार भिंतींच्या बाहेर आलो की, तो वैज्ञानिक दृष्टिकोन अनेकदा नाहीसा होतो. 

अगदी वैज्ञानिक क्षेत्रातसुद्धा काही अंधश्रद्धा दिसून येतात. काही शास्त्रज्ञ “शुभ मुहूर्तावर” प्रयोग सुरू करतात, किंवा “चांगल्या वेळेस” आपले शोधनिबंध प्रकाशनासाठी पाठवतात. काहीजण प्रयोग सोडून जायला घाबरतात — कारण त्यांना प्रयोग अपयश होण्याची भीती वाटते. काहीजण यश किंवा अपयश याचा अर्थ तांत्रिक चुका किंवा यशस्वी प्रयोगाचे श्रेय चांगले वाईट डिझाइन न मानता, देवाच्या इच्छेशी जोडतात.

ही वैयक्तिक श्रद्धा आणि व्यावसायिक काम यांची सरमिसळ वरवर काहीही त्रासदायक वाटू शकत नाही. पण याचा समाजावर चुकीचा आणि  गंभीर परिणाम होतो.

समाजात शास्त्रज्ञ हे आदर्श मानले जातात — सत्य शोधणारे आणि तर्कशुद्धतेचे प्रतीक. जेव्हा असे लोक पुराव्याशिवाय पारंपरिक गोष्टी करताना दिसतात, तेव्हा समाज गोंधळात पडतो. त्यामुळे काही चुकीचे समज पसरतात — जसे की अशी दुहेरी विचारसरणी (तर्क आणि अंधश्रद्धा एकत्र) योग्यच आहे असे वाटणे. त्याहूनही वाईट म्हणजे, विद्यार्थ्यांना सांगितले जाते, “तो प्रसिद्ध शास्त्रज्ञसुद्धा यावर विश्वास ठेवतो — मग तू का नाही?” त्यामुळे विद्यार्थी स्वतंत्र विचार करण्याऐवजी मागे हटतात.

यामुळे खरे वैज्ञानिक, जे तर्कशुद्धतेवर भर देतात, बाजूला सारले जातात. समाज त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, आणि अशा शास्त्रज्ञांकडे पाहतो जे अजूनही अंधश्रद्धा पाळतात. यामुळे विज्ञानाची खरी मूल्यं दुर्बल होतात आणि असं वाटायला लागतं की विज्ञान आणि अंधश्रद्धा एकत्र चालू शकतात.

आपल्याला लोकांना शिकवावे लागेल की शास्त्रज्ञसुद्धा सामान्य माणसेच असतात. तेही आपल्या सारख्याच समाजात वाढतात, त्यांच्यावरही त्यांच्या कुटुंबाचा, वातावरणाचा, आणि परंपरेचा प्रभाव असतो. विज्ञान शिकल्याने आपोआप सर्व जुन्या समजुती निघून जात नाहीत. पण फरक असतो — तो म्हणजे ‘जाणीव’. प्रत्येक शास्त्रज्ञ विज्ञानाचं मूळ तत्त्व ओळखतो असं नाही. आणि प्रत्येक श्रद्धा वैज्ञानिक चर्चेत स्थान मिळवू शकते असंही नाही.

समाजाने हे समजून घेतलं पाहिजे की श्रद्धा आणि ज्ञान वेगळे आहेत. वैज्ञानिक ज्ञानासाठी पुरावे, प्रयोगांची पुनरावृत्ती, आणि तर्कशक्ती लागते. लोक त्यांच्या खाजगी श्रद्धा बाळगू शकतात, पण वैज्ञानिक भूमिकेत असताना त्यांनी आपल्या वागण्याचा समाजावर होणारा परिणाम लक्षात ठेवला पाहिजे.

आणि शेवटी, हे लक्षात ठेवायला हवं — शास्त्रज्ञदेखील आपल्या सारखेच लोक असतात. तेही या समाजाचा भाग असतात. तेही त्याच गोष्टींमध्ये मोठे होतात. त्यांच्या मनातही वेगवेगळ्या भावना, श्रद्धा आणि विचार असतात. पण खऱ्या वैज्ञानिक विचारसरणीकडे जाण्याची सुरुवात इथूनच होते — स्वतःला तटस्थ दाखवून नाही, तर आपले पूर्वग्रह स्वीकारून.

प्रत्येक माणसाजवळ काही ना काही अंधश्रद्धा किंवा सवयी असतात. माझ्याजवळही असतील. पण त्या ओळखून, त्यांच्यावर विचार करून, आणि त्या बदलण्याचा प्रयत्न करणं — हीच खरी वैज्ञानिक वृत्ती आहे. केवळ विज्ञानाच्या पुस्तकांतच नाही, तर आपल्या आयुष्यात, आपल्या कामात, आणि आपल्याला हवी असलेली अधिक चांगली मानवता घडवण्यासाठी.

कारण विज्ञान हे केवळ नव्या गोष्टी शोधण्याविषयी नाही — तर जुन्या चुकीच्या समजुती मागे टाकण्याची हिंमत ठेवण्याविषयीही आहे.

-डॉ विनायक कांबळे