Saturday, February 17, 2024



निळेशार वाटे हे आभाळ सारे
निळे वाहते पाणी त्याखालूनी
कुण्या गावचा पूल दोन्ही किनारे
पहा जोडतो पाय तो रोवूनी

निळ्या डोंगराच्या पुसटत्याच रेषा
फिक्या होत जातात क्षितिजातूनी
निळ्या या नभाने उधळून द्यावे
निळे दान अपुल्याच हातातूनी

निळी होत जाते मी डोकावताना
निळ्या खोल डोहातली होऊनी
नदीच्या तळाशी कुठे खोल आर्त
निळे सूर येतात पाण्यातूनी

दिशा होत जाता निळ्या सावळ्याशा
निळे रंग येतात स्वप्नातूनी
तुझी होत जाते तशी वाहताना
प्रवाहात माझ्या मी गाण्यातूनी

-विनायक कांबळे

No comments:

Post a Comment